सुनीती नी. देव - लेख सूची

‘यू टर्न’च्या निमित्ताने

आनंद म्हसवेकर लिखित ‘यू टर्न’ ह्या नाटकाचा १४३ वा प्रयोग नुकताच पहिला. या नाटकाविषयी, कथानकाविषयी, प्रयोगाविषयी पूर्वी वाचलेलेच होते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग पाहण्याची उत्सुकता होती व तशी संधी मिळाली म्हणून ती सोडली नाही. नाटकाच्या तांत्रिक बाबींविषयी मी लिहिणार नाही कारण त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. मला फक्त कथानकाविषयी व त्यात मांडणी केलेल्या समस्येविषयी काही लिहायचे …

‘मर्मभेद’च्या निमित्ताने, आमच्या विषयाची स्थिती

मर्मभेद हा ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. मे.पुं.रेगे ह्यांनी लिहिलेल्या टीकालेखांचा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपादक आहेत प्रसिद्ध साहित्यिक एस्.डी.इनामदार. ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी, तज्ज्ञांनी तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि धर्म इ. विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचे, लेखांचे रेगे सरांनी केलेले परीक्षण, त्याला काही लेखकांनी दिलेली उत्तरे तसेच रेगे सरांनी केलेला खुलासा समाविष्ट आहे. रेगे सरांचे लेख प्रामुख्याने नवभारत या …

आमचे नाना

३१ डिसेंबर २००५ च्या पहाटे १.३० वाजता नानांनी या जगाचा निरोप घेतला. वय ८९ वर्षे! म्हटले तर पिकले पान! खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक? मी सभेवरून आले आणि …

‘तर्कशास्त्र’ : पूर्णपणे फसलेले लिखाण

काही दिवसांपूर्वी डॉ. संतोष ठाकरे ह्यांनी ‘अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. अंत्य परीक्षेसाठी नेमलेल्या अभ्यासक्रमावर आधारित’ लिहिलेले तर्कशास्त्र हे पुस्तक वाचनात आले. पुस्तक वाचून हसावे की रडावे हेच समजेना. अलीकडच्या तरुण प्राध्यापक मंडळींना अल्पावधीतच आपल्याला मान्यता मिळावी ही इच्छा असते आणि ह्या इच्छेपोटी मग एखादा लेख, एखादे पुस्तक लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. परंतु त्यासाठी आवश्यक असलेले …

‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’च्या निमित्ताने.

‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’ हा इंग्रजी शीर्षक असलेला मराठी चित्रपट. दिग्दर्शिका अदिती देशपांडे. नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या झालेल्या प्रभावातून पुरतेपणी भानावरही आले नव्हते, तर एक प्रतिक्रिया कानावर आली, ‘चावून चावून चोथा झालेला विषय आहे’ प्रतिक्रिया व्यक्त करणारा अर्थात पुरुष! ज्याला मिसेस् राऊतच्या वेदनांशी आपली नाळ जोडता येईल, तो कोणीही अशी प्रतिक्रिया व्यक्त करणार …

‘उंबरठा’ने मनात निर्माण केलेले प्रश्न

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर ‘उंबरठा’ हा सिनेमा पुन्हा पाहिला. २०/२५ वर्षांपूर्वी तो जेव्हा प्रथम प्रदर्शित झाला तेव्हाही पाहिला होता आणि त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चर्चेचा कार्यक्रमही आयोजित केला होता. आजही तो चित्रपट माझ्या मनात तीच अस्वस्थता, तेवढ्याच तीव्रतेने निर्माण करून गेला. या अस्वस्थतेत वाचकांनाही सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून ही प्रश्नावली. १. महाजन कुटुंबाच्या घरातील एकंदर …

‘मित्र’ च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी ‘मित्र’ या सुयोग निर्मित नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. नाटकाविषयी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली परीक्षणे वाचली होती. तेव्हाच हे नाटक बघायचे असे ठरविले होते. आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. लागूंची भूमिका! इतर नाटकांप्रमाणेच ह्याही नाटकात डॉक्टरांनी अभिनयाची जी उंची गाठली आहे ती अवाक् करणारी आहे. सतत आपण काहीतरी अद्भुत अनुभवीत आहोत ही भावना …

‘देहभान’: एका आदिम सत्याचा पुनरुच्चार

अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित देहभान नाटक पाहिले. नीना कुलकर्णी आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकमींनी त्यात भूमिका केलेल्या आहेत. इतर सहकलाकारांनी त्यांना दिलेली साथही उल्लेखनीय आहे. नाटक दोन पातळ्यांवर घडतंय. एका महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त होणाऱ्या स्नेह-संमेलनात उत्कृष्ट नाटक सादर केले जावे ह्या हेतूने ‘देहभान’ या कादंबरीवर आधारित नाटक सादर करण्याचा धाडसी निर्णय …

‘हरीभरी’च्या निमित्ताने

माझ्या मित्रमैत्रिणींनी शिफारस केली म्हणून ‘हरीभरी’ पाहायला गेले. शाम बेनेगल दिग्दर्शक, शबाना आझमी, रजित कपूर, नंदिता दास आदी कसलेले कलाकार वाचल्यावर ‘हरीभरी’ नक्कीच आपल्याला आवडेल असा असणार असे वाटले. शाम बेनेगल कोणती तरी सामाजिक समस्या घेऊन येणार व त्याला आशादायी असे उत्तर सुचविणार ह्याची अपेक्षा होती. (‘अंकुर’मधील लहान मुलाने काचेवर दगड फेकून व्यवस्थेला आपला नोंदवलेला …

सावर.. रे !

भारत सासणे यांच्या ‘एका प्रेमाची दास्तान’ ह्या कथेचे नाट्यरूपांतर केलेले सावर रे! हे नाटक नुकतेच पाहिले. नाटक वैचारिक, संवादप्रधान आहे. विषय प्रौढ अविवाहित स्त्रीसंबंधीचा आहे. नायिका इंदू ही बुद्धिमान असल्यामुळे लहानपणापासूनच ‘तू इतरांपेक्षा वेगळी आहेस’ हे तिच्या मनावर बिंबवलेले. एरवी, ‘तू मुलगी आहेस, परक्याचे धन आहे’ वगैरे, वगैरे चाकोरीबद्ध विचारांपासून तिला जाणीवपूर्वक दूर ठेवलेले. इंदूदेखील …

‘माझं घर’च्या निमित्ताने

‘माझं घर’ या जयंत पवार लिखित नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला. जयंत पवार हे प्रायः समस्याप्रधान नाटकलेखक म्हणून जसे परिचित आहेत तसेच सकस नाट्यसमीक्षक म्हणूनही सुपरिचित आहेत. हेही नाटक एक कौटुंबिक समस्या घेऊनच तुमच्या समोर येते, पण ते केवळ तुमच्यापुढे समस्या ठेवत नाही तर तिला उत्तरही देते. नवरा कलावंत! आपल्याला जपावे, फुलवावे ही त्याची बायकोकडून अपेक्षा. …

स्त्रीपुरुषतुलना – ले. ताराबाई शिंदे (१८५० – १९१०)

स्त्रीपुरुषतुलना हे ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली लिहिलेले पुस्तक श्री शिवाजी छापखाना, पुणे येथून प्रसिद्ध झाले. श्री. विलास खोले यांनी त्या पुस्तकाची नवीन आवृत्ती संपादित केली आहे. मूळ संहिता उपलब्ध असताना पुन्हा हे पुस्तक संपादन करण्याचे प्रयोजन सांगताना संपादक म्हणतात, “पूर्वाभ्यासातील उणिवा दूर करणे, नवीन माहितीचा शोध घेणे आणि साहित्यकृतीचा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणे या …

एक प्रकट चिंतन

अलीकडेच मी नथुराम बोलतोय ह्या नाटकाच्या निमित्ताने उठलेले वादळ, झालेला गदारोळ व त्यावर बंदी घालून ते शमविण्याचा झालेला प्रयत्न ह्यासंबंधी वृत्तपत्रातून वृत्त, प्रतिक्रिया वाचताना एक विचार सतत मनाला भेडसावत होता. हे सत्यान्वेषण की विकृती? गांधींवर एकामागून एक तीन नाटके आली. पैकी गांधी विरुद्ध गांधी, गांधी आणि आंबेडकर ह्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. गांधी विरुद्ध गांधी …

प्रा. रेगे आणि ईश्वर

‘कालनिर्णय’ ह्या दिनदर्शिकावर (१९९५, १९९६ आणि १९९८) प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे अनुक्रमे ‘मी आस्तिक का आहे?’, ‘परंपरागत श्रद्धा’ आणि ‘देवाशी भांडण’ हे तीन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या लेखांमधील विषयाशी संबंधित आजचा सुधारक (एप्रिल, १९९१) या मासिकात प्रसिद्ध झालेला ‘विवेकवादाच्या मर्यादा’ हा लेख असे एकूण चार लेख माझ्या डोळ्यांसमोर आहेत. ह्या लेखांमधून रेगे सरांची …

अनोखा उंबरठा

लेखक : वि. गो. कुळकर्णी प्रकाशक : राजहंस प्रकाशन, मूल्य : ६० रुपये आमच्या मित्राला ‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक अतिशय आवडले, म्हणून त्याने आमच्यासह आणखी काही इष्टमित्रांना ते चक्क सप्रेम भेट दिले. पुस्तक अगदी ताजे म्हणजे १ मे १९९७ रोजी प्रथमावृत्ती निघालेले! झपाटल्यासारखे वाचून काढले अन् मित्राच्या निवडीला व भेट देण्यातील कल्पकतेला मनोमन दाद दिली. …

निमित्त मुलाच्या विवाहाचे

आमच्या मुलाचा विवाह २४ डिसेंबर १९९७ रोजी नोंदणी पद्धतीने झाला. आमचे कुटुंबच पुरोगामी विचारांचे, विवेकवादी विचारसरणीवर चालणारे! आम्हाला व्याहीही समविचारी मिळाले. विवाह किती साध्या पद्धतीने साजरा करावा ह्याचा विचार केल्यानंतर ठरले की फक्त सख्खी बहीण भावंडे बोलवायची. मामा, मामी, मावशी, आत्या, काकू कोणीही नाही. मित्रमैत्रिणींचे प्रतिनिधित्व करणारी एक मैत्रीण व एक मित्र! ते दोघेही साक्षीदार …

‘बैंडिट क्वीन’च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी माझ्या एका विद्यार्थी मित्राचे पत्र आले. त्यात त्याने लिहिलेल्या ‘बैंडिट क्वीन’वरील प्रसिद्ध झालेल्या लेखाचे कात्रण होते. तो लेख वाचला, मनापासून आवडला, तसे त्याला कळविले अन् सिनेमा पाहण्याचे ठरविले. तोवर सिनेमा पाहावा हे तीव्रतेने जाणवले नव्हते. कुटुंबीय आणि इष्ट मित्रांसह सिनेमा पाहून आलो. परवा घातलेली बंदी वाचून आपण सिनेमा पाहण्याची संधी हुकवली नाही ह्याचे …

प्रतिक्रिया

‘संदर्भ न पाहता लावलेले अर्थ’ या शीर्षकांतर्गत डॉ. के. रा. जोशी ह्यांची दोन टिपणे आजचा सुधारक (मे, १९९४) च्या अंकात प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील दुसऱ्या टिपणासंबंधीची माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे. डॉ. के. रा. जोशी हे माझे शिक्षक. ते गंभीरपणे करीत असलेल्या ज्ञानसाधनेविषयी पूर्ण आदर बाळगून मी मतभेदाचे मुद्दे नमूद करू इच्छिते. दुसऱ्या टिपणाच्या शेवटच्या चार …